Vaishnavi Hagawane Death Case Update Saam Tv News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Death : हगवणे पिता-पुत्राच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेषही नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली

Vaishnavi Hagawane Death Case Update : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे चार वाजता वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना अटक केली. पोलिसांनी सापळा रचत हगवणे पिता-पुत्रांना बेड्या ठोकल्या. यानंतर दोघांना आज दुपारी पुणे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोघांच्या कोठडीची मागणी केली. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे २८ मे पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.

वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाईपने मारहाण केली होती. पोलीस तपासात हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. पोलिसांनी ज्या पाईपने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप जप्त केल्याची माहिती आता समोर येत आहे. याच मारहाणीचा प्रकार पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कलमवाढ केली आहे. दरम्यान, कोर्टात हजर करताना पत्रकारांनी राजेंद्र हगवणेला प्रश्न केला की, राजेंद्र तुला काही बोलायचं आहे का? त्यावर तो नाही बोलला. तुला पश्चाताप होतोय का? तेव्हा देखील त्याने नकारार्थी मान हलवली.

सुनावणीनंतर वैष्णवीच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'दोन आरोपींना आणलं होतं. त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पहिलीच पीसी होती. तपास करणं बाकी आहे. मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. परत अजून कुणी कुणी मदत केली याचादेखील तपास करणं बाकी आहे, हे देखील कारण पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणी आरोपी निष्पन्न होतील का? त्या अनुषंगाने देखील तपास सुरु आहे. त्यासाठी देखील पोलिसांनी कोठडी मागितली आहे. तपास अजून चालू आहे. तपासात माहिती समोर येईल तसे आणखी कलम वाढवले जाऊ शकतात', अशी माहिती वकिलांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT