मुंबईत कोविड-१९ लसीकरणाची वेळ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत कोविड-१९ लसीकरणाची वेळ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

मुंबईत कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांतून प्रकाशित होणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड - १९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यादरम्यान लसीकरण केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवसाची लसीकरण संबंधी माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता समाज माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे. (Vaccination time for Covid-19 in Mumbai is from 9 am to 5 pm daily)

देशभरात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस साठ्याच्या उपलब्धते सापेक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आणि तेथे नियोजित सत्रांची माहिती प्रसारमाध्यमांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत समाज माध्यम स्थळावरून दररोज सायंकाळी प्रकाशित देखील केली जाते. यामध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांचा समावेश आहे.

हे देखील पहा -

नागरिकांच्या सोयीसाठी आणि लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना अंमलबजावणीत सुसूत्रता आणता यावी यासाठी आता सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांची कामकाजाच्या दिवशी (म्हणजेच रविवार/लस साठा नसल्यास लसीकरण बंद असल्याचे दिवस वगळून) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित करण्यात येईल.

अर्थात उपलब्ध लस साठ्याच्या सापेक्ष ही वेळ असेल. तसेच निश्चित केलेल्या वेळेत काही बदल होणार असेल तर त्याची आगाऊ माहिती प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून मुंबईकर नागरिकांपर्यंत पोचविण्यात येईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT