पुण्यात सिरिंज अभावी लसीकरण बंद; 60 हजार लसी शिल्लक
पुण्यात सिरिंज अभावी लसीकरण बंद; 60 हजार लसी शिल्लक Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात सिरिंज अभावी लसीकरण बंद; 60 हजार लसी शिल्लक

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

पुण्यात दरवेळी लसींच्या तुटवड्यामुळे बंद ठेवलं जाणारं लसीकरण आत मात्र लस असुनही बंद राहणार आहे. आणि याला कारण ठरला आहे तो चक्क सिरिंजचा तुटवडा. पुणे महापालिकेला लस देण्यासाठी ५० हजार सिरिंजची गरज आहे. मात्र हे पुरेशा सिरिंज उपलब्ध न झाल्याने चक्क लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सध्या महापालिकेकडे ६० हजार लसी शिल्लक आहेत. मात्र सिरिंज साठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पुण्यात काल नवे १८९ रुग्ण आढळले आहेत. १४१ लोकांनी कोरोनावरती मात केली आहे. त्याचबरोबर पुण्चाक १४४२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुण्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे चालू आहे. एकेकाळी पुण्यात हजोरो रुग्ण आढळत होते. काल पुण्यामध्ये फक्त दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे नागपूरने कोरोनाला हरवत शुन्य कोरोना रुग्ण आणि शुन्य मृत्यू झाले आहे.

दरम्यान काल राज्यात काल 3,187 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 3,253 रुग्णांनी कोरोनावरती काम केली आहे. राज्यात काल 49 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 36,675 रुग्ण अॅक्टिव आहेत. आतापर्यंत 65,47,793 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 63,68,530 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. तब्बल 1,39,011 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.राज्यात 5,88,84,819 नागरिकांचा कोरोनाची चाचणी झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेच्या दृष्टिने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जास्त प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरचा ताण कमी झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT