Game photo  Saam Tv
मुंबई/पुणे

मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने मुलीने उचलले टोकाचं पाऊल; कुटुंबावर शोककळा

पब-जी खेळू न दिल्यानं लखनऊमध्ये १६ वर्षीय मुलाकडून आईची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय एका लहान मुलीच्या जीवावर बेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बाँदा : पब-जी (Pub-g) खेळू न दिल्यानं लखनऊमध्ये १६ वर्षीय मुलाकडून आईची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय एका लहान मुलीच्या जीवावर बेतली आहे. उत्तर प्रदेशच्या अतर्रा येथील राहणारी चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मोबाईल गेम (Game) खेळताना मोठ्या भावाने खेचला. त्यामुळे चिडलेल्या लहान बहिणीने गळफास घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेवेळी मुलीचे आई-वडील घरात नव्हते. ( Uttar Pradesh Crime News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, अतर्रा पोलीस ठाण्याअंतर्गत सिव्हिल लाईन्स येथील रहिवाशी चालक पूरन वर्मा यांना पाच मुले आहेत. त्यांची ९ वर्षांची लहान मुलगी लक्ष्मी गुरुवारी मोबाईलवर गेम खेळत होती. त्याचवेळी तिचा १२ वर्षीय मोठा भाऊ रानू यालाही मोबाईलमध्ये गेम खेळायचा होता. त्यासाठी त्याने तिच्या हातातून मोबाईल खेचला. गेम खेळण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणात रानूने लक्ष्मीच्या हातातून मोबाईल (Mobile) खेचला. त्यानंतर रानू एकटाच मोबाईलवर गेम खेळू लागला.

मोबाईल खेचल्याने चिडलेली लक्ष्मी रडत रडत दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. त्यामुळे रानूला लक्ष्मी आत काय करतेय हे काहीच कळाले नाही. काही वेळानंतर मोठी बहिण निशाने जेवण बनवल्यानंतर लक्ष्मीला आवाज द्यायला गेली. त्यावेळी निशाला लक्ष्मी ही खोलीतील पाळण्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. लक्ष्मी अवस्था पाहताच निशाला मोठा धक्का बसला. त्यानंतर निशा आणि तिचा भाऊ जोरजोरात रडू लागले. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे शेजारी तिच्या घरी जमले. त्यानंतर शेजाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवला. त्याच स्थितीत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टारांनी तपासून मृत (Death) घोषित केले.

या घटनेवर बहिण निशाने सांगितले की, 'लहान बहिण इयत्ता चौथीत शिकत होती. शाळेत खूप हुशार होती. या घटनेवेळी आई बाजारात खरेदी करण्यासाठी गेली होती. तर वडील चालक असून ते वाहन घेऊन बाहेर गेले होते'. तर मृत लक्ष्मीच्या वडिलांनी सांगितले की, 'लक्ष्मी खूप हुशार होती. सर्वात मोठा मुलगाही बाहेर असतो. मोठा भावाने अलीकडेच त्याच्या पत्नीला आणले होते. तिच्याकडून लक्ष्मीने शिलाई करणे शिकले होते. पूरन वर्मा यांनी पुढे सांगितले, 'मोठी मुलगी एका नातेवाईकाच्या लग्नाच्या सोहळ्यासाठी घरी आली होती. तिच्या लहान बाळासाठी साडीचा पाळणा बनवला होता. त्याच पाळण्याला लटकून लक्ष्मीने गळफास घेतला. घटनेवळी घरात फक्त मोठी मुलगी, मुलगा रानू आणि दुसरा १५ वर्षीय मुलगा शैलेंद्र घरात होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT