Urfi Javed Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Urfi javed : उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणारा अटकेत; कोण आहे ती व्यक्ती?

मुंबई पोलिसांनी उर्फीला धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Urfi Javed Latest News : छोट्या पडद्यावरची बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा उर्फी वेगवेगळ्या वादांत अडकत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उर्फीला बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता मुंबई पोलिसांनी उर्फीला धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

नवीन रंजन गिरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी त्याला बिहार येथून अटक केली आहे. आरोपी नवीन याने फोन करून उर्फीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर तुझ्यावर बलात्कार करू असं म्हणत आरोपीने उर्फीला शिवीगाळ देखील केली होती.

या सर्व प्रकारानंतर उर्फी जावेदने पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, धमकी देणारा आरोपी हा बिहार येथील असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.

त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन याला पटना येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. अटक करून पोलिसांनी नवीनला मुंबईत देखील आणलं आहे.

उर्फीला धमकी देणारा कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन गिरी हा रिअल इस्टेट ब्रोकर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. त्यासाठी कमिशन म्हणून ठराविक रक्कम उर्फी नवीन याला देणार होती. मात्र, आरोपीच्या म्हणण्यानुसार अभिनेत्री उर्फी जावेद त्याला ठरलेले कमिशन देत नव्हती. म्हणूनच नवीनने उर्फीला व्हॉट्सअॅपवर फोन करून पैशासाठी धमकावण्यास सुरुवात केली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paid Menstrual Leave: सरकारीच नव्हे, खासगी क्षेत्रातही महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी

Crime News: कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal Pune Land Mafia Exposed: घायवळ पुण्यातला लँड माफिया? पोलिसांच्या तपासात कारनामे उघड

Government Apps: तुमच्या फोनमध्ये 'हे' सरकारी अ‍ॅप्स असायलाच हवेत

Maharashtra Politics: भाजपचा नारा; जिथं बळ, तिथं स्वबळ, मराठवाड्यात भाजपला दादांची NCP नको?

SCROLL FOR NEXT