Urfi Javed-Chitra Wagh News : सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात 'पोस्टयुद्ध' सुरू असतानाच त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी या वादावरून थेट चित्रा वाघ यांना लक्ष्य केलं आहे.
उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर कमी कपड्यांमध्ये फिरत असल्याची तक्रार एका महिलेनं चित्रा वाघ यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला इशारा दिला होता. उर्फी समोर दिसली तर थोबडवेन असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर उर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
आता या वादानं राजकीय वळणही घेतलं आहे. या वादात सुषमा अंधारे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनीही उडी घेतली आहे.
उर्फी की बर्फी कोण काय घालते यात मला काही रस नाही. चित्रा वाघ यांनी कितीही आरडाओरडा केला तरी मुली अशा प्रकारे फिरणं थांबवणार नाहीत. आता लोकांनीच ठरवायला हवं की कोणी कसे आणि किती कपडे घालावेत. हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असं चव्हाण म्हणाल्या.
ज्या चित्रा वाघ उर्फी जावेदचा थोबाड फोडण्याच्या वल्गना करतात, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काही कारवाई करणार की नाही, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
विद्या चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवार काय बोलले, त्यावर टीका करता. मुख्यमंत्री आहात तर महागाई आणि बेरोजगारीवर बोला, बाकी कुठल्या गोष्टीवर बोलू नका. अजित पवारांनी काम केलेलं बघवत नाही. म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय, पण अशांना आम्ही भीक घालत नाही, असं त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.