Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Mantralaya News: अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन, दुसऱ्या माळ्यावरून संरक्षण जाळीवर मारल्या उड्या

Mumbai News: मंत्रालयात अप्पर वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात घुसून अप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलनकांनी आंदोलन केलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असं म्हणत आंदोलनकांनी मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरून सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या आहेत. धरणग्रस्त आंदोलकांनी संरक्षक जाळीवर उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच गोंधळ उडाला आहे. मंत्रालयात आंदोलन करणारे शेतकरी अमरावतील जिल्ह्यातील आहेत.

अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयालयातील सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारात आंदोलन केलं. या आंदोलनातील एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्याला भोवळ आली. त्यानंतर तातडीने या शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले.

धरणग्रस्तांचे प्रश्न ४० वर्षांपासून प्रलंबित

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक दिवसांपासून धरणग्रस्तांचा आंदोलन सुरु होतं. मात्र सरकारने आंदोलनांची साधी दखलही न घेतल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट मंत्रालय गाठलं.

दरम्यान, मंत्रालयात आंदोन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आझाद पोलीस ठाण्यात पाठवले आहेत. पोलिसांनी १२ ते १५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मंत्रालयातील आंदोलनावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, 'मंत्रालयात कोणीही उड्या मारू नये. त्यांचा आवाज कोणी ऐकत नसेल तर सरकारने लक्ष द्यावे. राज्यात युवकांचे प्रश्न आहेत. तसेच राज्यातील लोकांना काय हवे यावरही चर्चा झाली पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Deshmukh : बापावर हल्ला, मुलगा मैदानात; सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर इजा, उपचार सुरु; वातावरण तापलं

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT