Maharashtra Weather Updates  SaamTV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain: राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा, शेतकऱ्यांची धावपळ

Maharashtra Rain News: रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा बसला.

Satish Daud

Maharashtra Weather Updates

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा बसला.

त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. नगर तालुका आणि पारनेर तालुक्यात मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात तुफान गारपीट

नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याशिवाय कांद्याचे पिकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलं आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहेत.

बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

बुलढाण्यात रविवारी रात्रीच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात तुफान गारांचा पाऊस झाला. सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात गारांमुळे शेतातील हरबरा गहू मिरची पिकांचं मोठ नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

धुळे जिल्ह्यांत तुफान पाऊस

धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये रविवारी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली खरीप हंगामातील पिके पावसात भिजली आहेत. त्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची धावपळ

पुणे शहरासह जिल्ह्यात रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्यात रविवारी ४९.२ मी मी एवढ्या पावसाची काल नोंद झाली. पुढील दोन दिवस पुण्यात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. खुलताबाद, दौलताबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागा आणि भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानी भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT