4 and 5 december rain possibility in kokan and mumbai, Unseasonal rains in Mumbai, Mumbai Rain News Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईत अवकाळी पाऊस; चाकरमान्यांची उडाली तारांबळ

Mumbai Rain Live Updates: गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुंबई पूर्व उपनगरात पाऊस पडला. यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

जयश्री मोरे

मुंबई: राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे पारा चढलेला असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुंबई पूर्व उपनगरात पाऊस (Mumbai Rain) पडला. यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. पावसात भिजू नये यासाठी आपल्या दुचाकी झाडाखाली आणि ब्रिज खाली लावण्यात आल्या. तसेच पायी चालणाऱ्यांनी मिळेल तिथे आसरा घेतला. (Unseasonal rains in Mumbai Inconvenience to people going to work)

हे देखील पाहा -

मुंबईसह कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या मुंबई विभागाने (IMD Mumbai) पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्‍ये पुढील 3-4 तासांमध्‍ये विजांच्या कडकडाटासह वादळ वाहील असा इशारा (Weather Updates) दिला होता. तसेच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यताही वर्तवली आहे. यावेळी घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असं आवाहन आयएमडीच्या मुंबई विभागाने केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT