शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनोखी आदरांजली दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनोखी आदरांजली

राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीवर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या तैलचित्रावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर महिला वर्गाने ध्येयमंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण केली.

दिलीप कांबळे

मावळ: देहूरोड येथे किल्ले अभ्यास समिती संकल्प सोशल फाऊंडेशन यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. राजगड किल्ल्याची प्रतिकृती चिमुकल्यांनी आपल्या हाताने तयार करून किल्यावर पणती पेटवून आणि मशालीच्या धगधगीत बाल शाहीर भिमांशू साळवीने छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देत परिसर दणाणून टाकला. तर महिला वर्गाने ध्येयमंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीवर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या तैलचितत्रावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कारण किल्ले आणि बाबासाहेब पुरंदरे यांचं अतूट नात होतं. (Unique tribute to Shivshahir Babasaheb Purandare)

हे देखील पहा -

महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तब्बल तीन पिढ्यांसमोर शिवचरित्र मांडलं. त्यांनी शिवशौर्य आणि शिवकार्य सांगून चांगला समाज घडविण्यात योगदान दिले. पुरंदरे यांनी त्यांचे आयुष्य संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलं होते. लिखाणा बरोबरचं जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने देऊन त्यांनी केलेले कार्य महान आहे, त्यामुळे त्यांना ही अनोखी श्रद्धांजली देण्यात आली आहे. दरम्यान बाबासाहेब पुरंदरेंच्या आठवणीत शिवप्रेमी हरपून गेले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT