डिजेल पेट्रोल आणि गँस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीचे अनोखे आंदोलन... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

डिजेल पेट्रोल आणि गँस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीचे अनोखे आंदोलन...

नाशिक महामार्गावर चुलीवर स्वयपाक करत महिलांनी दरवाढीच्या विरोधात आंदोलन

रोहिदास गाडगे

खेड - डिझेल-पेट्रोल पाठोपाठ आता गॅसच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या दरवाढीच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने राजगुरुनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर चुलीवर स्वयपाक करत महिलांनी दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले.

हे देखील पहा -

बैलगाडीत बसुन शिवसेना महिला कार्यकर्ते पुणे नाशिक महामार्गावर पोहचल्या आणि डिजेल पेट्रोल गॅसची झालेली दरवाढ यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, गृहिणी त्रस्त झाल्यात तर घर खर्चाचे बजेट कोलमडत आहे. इंधन दरवाढीने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या दरवाढीचा निषेध व्यक्त करत महिलांनी पारंपरिक पद्धतीने चूल पेटविली आहे.

यावेळी शिवसेना महिला अध्यक्ष विजया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट,ज्योती अरगरडे,उर्मिला सांडभोर,संगीता फापळ,नंदा कड,मिना नेहेरे सिमा बोंबले अर्चाना सांडभोर तालुकाध्यक्ष रामदास धनवटे,शिवाजी वर्पे उपस्थीत होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT