धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सर्व एसटी महामंडळाच्या संघटनांनी एकत्र येत राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे लॉकडाउननंतर पुन्हा एसटीची चाके थांबली आहेत. ऐन दिवाळी उत्सवाच्या तोंडावर बस थांबल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. (dhule-news-msrtc-bus-stop-again-Indefinite-strike-of-employees)
धुळे परिवहन विभागाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी देखील राज्यव्यापी संपला प्रतिसाद दिला असून धुळ्यात देखील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत राज्य शासनातर्फे गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत बेमुदत संपाची हाक दिली आहे.
बसस्थानकात अडकले प्रवाशी
सकाळपासूनच धुळे परिवहन विभागाच्या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. धुळेमार्गे प्रवास करीत पोहोचलेल्या आणि पुढे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांना धुळे मध्यवर्ती बसस्थानकातच अडकल्यामुळे मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. परंतु जोपर्यंत राज्य सरकारतर्फे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जात नाही; तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बघावयास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.