जळगाव- पुणे प्रवास ६०० रुपयांचा; मुंबईसाठी ९५० भाडे

जळगाव- पुणे प्रवास ६०० रुपयांचा; मुंबईसाठी ९५० भाडे
जळगाव- पुणे प्रवास ६०० रुपयांचा; मुंबईसाठी ९५० भाडे

जळगाव : डिझेल दरवाढीनंतर आर्थिक स्थिती बिकट झालेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. २६) मध्यरात्रीपासून भाडेवाढ अमलात आली असून, एसटीची भाडेवाढ प्रवाशांची डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे. या भाडेवाढीनंतर जळगाव- पुणे मार्गावरील एसटीचा प्रवास तब्बल ८५ रुपयांनी महागला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यात एसटी महामंडळाने मंगळवारी मध्यरात्रीपासून १७. १७ टक्‍क्‍यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केला असून ही भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत होणार आहे. (jalgaon-news-msrtc-bus-rent-groath-shivshahi-jalgaon-pune-root-six-hundred)

कोरोनाच्‍या लॉकडाउन काळात महामंडळाला बसलेली आर्थिक झळ तसेच सातत्‍याने डिझेलच्या दरात होत असलेली वाढ व बसच्‍या देखभाल दुरुस्तीत वाढीमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर बोजा वाढल्याचा भार आता प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.

पुण्यासाठी ८५ रुपये भाडेवाढ

वाढता तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने प्रतिटप्पा भाडेवाढ लागू करताना प्रतिटप्पा ८ रुपये ७० पैसे याप्रमाणे भाडेवाढ झाली आहे. या भाडेवाढीमुळे साध्‍या बसचे भाडे जळगाव- पुणे प्रवास भाडे ५१५ रुपयांवरून ६०० रुपये, तर जळगाव- मुंबईचे (शयनआसनी) भाडे ७४० रुपयांवरून ८६५ रुपये इतके भाडे झाले आहे.

शिवशाही आवाक्‍याबाहेर

आरामदायी प्रवास करण्याच्या दृष्टीने महामंडळाने शिवशाही बससेवा सुरू केली आहे. यात वातानुकूलित शयनआसनी शिवशाही बस राज्यातील विविध मार्गावर सुरू झाल्या. महामंडळाच्या १७.१७ टक्‍के प्रवास भाडेवाढीनंतर शिवशाहीचा प्रवास सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. वातानुकूलित शिवशाही आणि स्लिपर कोच शिवशाही बसच्या भाड्यात मोठ्या फरकाने वाढ झाली आहे. जळगाव- पुणे शिवशाही बसचे भाडे ७६५ रुपयांवरून आता ७४०८९५ रुपये व शयनआसनी बससाठी ७०० रूपयांवरून ८२० रुपये मोजावे लागणार आहेत.

जळगावहून विविध मार्गावरील भाडे (कंसात जुने भाडे)

मार्ग........................साधी.......... शिवशाही................शयनआसन

जळगाव- पुणे.........६०० (५१५) ८९५ (७६५) ८२० (७००)

जळगाव- नाशिक.....३७५ (३२०) ५५५ (४७५) ५१० (४३५)

जळगाव- मुंबई........ – ९४५ (८१०) ८६५ (७४०)

जळगाव- औरंगाबाद...२४५ (२१०) ३६५ (३१०) ३३५ (२८५)

जळगाव- धुळे......… १४० (१२०) २१० (१८०) १९० (१६५)

जळगाव- नगर.......... – ६३५ (५४५) ५८० (४९५)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com