Ratan Tata saam tv
मुंबई/पुणे

Ratan Tata : रतन टाटांबद्दल जुनी आठवण सांगताना केंद्रीय मंत्रीही रडले! VIDEO

Piyush Goyal getting emotional : रतन टाटांनी पीयूष गोयल यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळची एक आठवण सांगताना गोयल यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

Saam Tv

Ratan Tata News : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानं अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. देशभरातील उद्योगपती, राजकीय नेत्यांपासून ते दिग्गज खेळाडूंनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रतन टाटांची एक आठवण सांगितली. ती सांगताना गोयल यांना अश्रू अनावर झाले.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एएनआयशी बोलताना रतन टाटांबद्दलची एक जुनी आठवण सांगितली. रतन टाटा यांनी गोयल यांच्या घरी भेट दिली होती. गोयल म्हणाले की, मला आजही आठवतंय की ते एकदा माझ्या घरी आले होते. आम्ही त्यांना नाश्त्यात केवळ इडली, डोसा दिला होता. पण त्यांनी खूप कौतुक केलं होतं. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम स्वयंपाकी असतील. पण त्यांनी आमच्या घरी अगदी साधेपणाने तयार केलेल्या नाश्त्याचं कौतुक केलं, असं गोयल म्हणाले. हे सांगताना गोयल यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

गोयल यांनी सांगितलं की, 'रतन टाटांनी त्यावेळी आमच्यासोबत जवळपास दोन तास घालवले. ते जेव्हा घरून निघत होते, त्याचवेळी त्यांनी माझ्या पत्नीला खूप प्रेमानं विचारलं की तुम्ही माझ्यासोबत एक फोटो घेऊ शकता का? खरं तर आम्हालाच त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण विचारू शकलो नव्हतो. हेच त्यांचे जे विचार आहेत, ज्यामुळे रतन टाटांवर १४० कोटी जनता आणि संपूर्ण जग प्रेम करतो.'

'रतन टाटा संवेदनशील व्यक्ती होते'

रतन टाटा हे खूप संवेदनशील होते. त्यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. भारताला गौरव प्राप्त करून दिलं. ते परोपकारी होते. प्रत्येक चांगल्या कामासाठी नेहमीच पाठीशी उभे राहायचे. देश जेव्हा कोविड महामारीचं संकट झेलत होता, तेव्हा रतन टाटांनी कोणताही विचार न करता १५०० कोटी रुपये दान करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे आम्हाला कोविडविरुद्ध लढा देण्यास मदत मिळाली, असंही गोयल यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT