- अभिजित देशमुख
जय श्रीराम...जय जय श्रीराम... अशा घाेषणा देत आज (मंगळवार) भिवंडीतून 1500 रामभक्त विशेष ट्रेनने कल्याणहून अयोध्येला (kalyan to ayodhya) रवाना झाले. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil Minister of State for Panchayati Raj) यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेली मंदिरे आपण उभी होताना बघत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट असल्याची भावना व्यक्त केली. (Maharashtra News)
कपिल पाटील म्हणाले यांच्या भाजपने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अयोध्येला पाठवण्याचा निर्धार केला आहे. प्रभू श्रीराम मंदिरात (shri ram mandir ayodhya) यांच्या मूर्तीसोबतच देशातील 140 कोटी लोकांच्या आस्थेची, संस्कृतीची, सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हा अनुभव आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रत्यक्ष घेता यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.
मुघलांकडून आपली मंदिरे पाडताना पूर्वजांनी पाहिले होते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेली मंदिरे उभी राहताना आपण पाहत आहाेत. हि गाेष्ट आपल्या सर्वांसाठी भाग्याची असल्याचे मंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेल्वे प्लॅटफॉर्मवर कपिल पाटलांचा वाढदिवस साजरा
दरम्यान कल्याण स्टेशनवरून आयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर मंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी रामनामचा घाेष केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.