unidentified women body found at wadala area mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बेवारस बॅगेत आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, मुंबईत खळबळ

Mumbai Crime News: मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बेवारस बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडेही करण्यात आले आहेत.

Satish Daud

Mumbai Crime News

मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बेवारस बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडेही करण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडाळा परिसरात (Mumbai News) उभ्या असलल्या एका ट्रकच्या पाठीमागे काही लोकांना एक बेवारस बॅग दिसून आली. या बॅगेतून उग्र वास येत होता. त्यांनी तातडीने याबाबची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी (Police) ही बॅग उघडून बघितली असता एका महिलेचा मृतदेह जळालेला अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे तुकडे देखील करण्यात आले होते. पोलिसांनी मृत महिलेचे डोके, धड आणि एक पाय सापडला आहे, मात्र दुसरा पाय गहाळ आहे.

मृत महिला ३० ते ३५ वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही.

दरम्यान, हा मृतदेह येथे कुणी टाकला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

SCROLL FOR NEXT