Mumbai Local Train  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आणखी एका तरुणाचा मृत्यू; मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यानची घटना

Mumbai Train News: मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० मे) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

Satish Daud

विकास काटे, साम टीव्ही ठाणे

मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० मे) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. मागील दोन महिन्यातील ही पाचवी घटना आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

दररोज लाखो प्रवाशांना घेऊन धावणारी मुंबईकरांची लाईफलाइन लोकल ट्रेन सध्या प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधून आणखी एका तरुणाचा बळी गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत होता. मुंब्रा ते कळवा स्टेशनदरम्यान ट्रेन आली असता, त्याचा दरवाजातून तोल गेला. या घटनेत सदरील तरुण गंभीर जखमी झाला.

प्रवाशांची या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मागील दोन महिन्यात लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची ही पाचवी घटना आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.राहुल अष्टेकर असे मृत प्रवाशाचं नाव होतं. आता आणखी एका तरुणाचा जीव गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT