Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : 'तू लडका है या लडकी' म्हणत तरुणीचा विनयभंग अन् मारहाण,उल्हासनगर हादरलं!

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीवर FIR दाखल झाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरात तरुणीचा विनयभंग आणि मारहाण

  • जाब विचारायला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनाही मारहाण

  • संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

  • पोलिस तपास सुरू

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचा विनयभंगकरून तिला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबियांना देखील मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम नंबर एक परिसरात राहणारी एका तरुणी रस्त्यावरून जात होती. यादरम्यान अंश करोतीया या तरुणाने तिला ' तू लडका है या लडकी' असे म्हणत हिणवले, तसेच तिची खिल्ली उडवली. एवढ्यावर न थांबता अंश करोतीयाने त्या तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण केली.

घडलेला हा सगळा तरुणीने कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार पीडित तरुणीचे कुटुंबीय अंश करोतीयाला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले. दरम्यान जाब विचारायला गेलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या चाळीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे .

मारहाण केल्याप्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंश करोतीया विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घातले आहे. शिवाय पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चितेजवळ उभे होते; डिझेल टाकताच भडका उडाला; आगीच्या विळख्यात ४ जण सापडले, एकाचा मृत्यू

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: डोळ्याला गॉगल लावलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा लग्न सोहळा धुमधडाक्यात, नवरदेव पलाश मुच्छल सांगलीत दाखल

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

SCROLL FOR NEXT