Big Blow to Shinde Sena in Ulhasnagar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

Big Blow to Shinde Sena in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदेगटाला मोठा धक्का बसला. शिंदेंच्या दुसऱ्या नगरसेवकाचे पद गेले. नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्या.

Priya More
  • उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का बसला

  • नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्या

  • जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पद रद्द झाले

  • स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का बसला. आणखी एका नगरसेविकेला अपात्र घोषीत करण्यात आले. नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला. पूजा भोईर यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे नगरसेवक पद गेलं. यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याआधी विक्की सिंग लबाना यांचे नगरसेवक पद गेले.

उल्हासनगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिंदे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. शिवसेनेच्या नगरसेविका पूजा भोईर यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेत नगरसेवक पद रद्द केलं आहे.

याआधी शिंदे गटाचे नगरसेवक विक्की सिंग लबाना यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पूजा भोईर यांचं नगरसेवक पद गेल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र ठरले असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा शिंदेगटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT