Security Guard End Life Due To Debt Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar News: ६ महिने पगार नाही... कर्ज कसे फेडायचे, सुरक्षारक्षकाने उचलले टोकाचे पाऊल

Priya More

अजय दुधाणे,उल्हासनगर

कर्जबाजारीपणाला कंटाळून उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून पगार नाही त्यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा या चिंतेत येऊन सुरक्षारक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. टिटवळा पोलिस ठाण्यात (Titwala Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेमुळे उल्हासनगरच्या साईराम कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरजवळील म्हारळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. राहत्या घरामध्येच या वक्तीने गळफास लावून आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजू धाटावकर असे असून ते उल्हासनगर महानगरपालिकेने म्हारळ गावात सुरू केलेल्या रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.

राजू यांना गेल्या सहा महिन्यापासून नोकरीच्या ठिकाणावरून पगार दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेक जणांकडून पैसे उसने घेतले होते. तसंच त्यांनी अनेकांकडून कर्ज देखील घेतले होते. मात्र कर्जाचे पैसे देता येत नसल्याने त्यांच्या घरी अनेक सावकार येत होते आणि ते त्यांना दम देत होते. या जाचाला आणि कर्जबाजारीला कंटाळून राजू धाटावकर यांनी आज आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राजू यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण झाला होता. तसेच त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. हे सर्वजण मारळ गावातील साईराम कॉलनी परिसरात राहत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT