Ulhasnagar Accident CCTV  Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये ट्रकच्या धडकेत एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रस्ता ओलांडत असताना या व्यक्तीला ट्रकने धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Priya More

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये वृद्ध व्यक्तीचा जागीत मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करत ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी उल्हासनगरमध्ये ट्रकच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. लक्ष्मण चिंचोरिया (७१ वर्षे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ मधील गोल मैदान येथील शिवशक्ती मेडिकलसमोर हा अपघात झाला. ट्रकने लक्ष्मण यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, लक्ष्मण चिंचोरिया गोल मैदान येथील शिवशक्ती मेडिकलसमोरून रस्ता ओलांडत असताना ट्रकने त्यांना धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. अपघाताची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातानंतर उल्हासनगर पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेतले अशून चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक भगवती ट्रान्सपोर्टचा असल्याची माहिती समोर आली आहे. भगवती ट्रान्सपोर्ट उल्हासनगर शहरभरामध्ये किराणा मालाचा पुरवठा करतो. मोठ्या वाहनांना शहरामध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश नसतो. असे असताना देखील हे ट्रान्सपोर्टवाले उल्हासनगरमध्ये बेदरकारपणे वाहनं चालवत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT