Ulhasngar News Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar : महापालिकेकडून 'पडीक' वाहनांवर कारवाई सुरू; वाहन मालकांना ४८ तासांची मुदत

रस्त्यावरून वाहनं न हटवल्यास होणार जप्त; उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

अजय दुधाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेल्या पडीक वाहनांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. ही वाहनं हटवण्यासाठी महापालिकेकडून वाहन मालकांना ४८ तासांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर ही वाहनं जप्त करून महापालिका त्यांची विल्हेवाट लावणार आहे.

उल्हासनगर (Ulhasnagar) शहर हे अतिशय दाटीवाटीचं व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच शहरातल्या अनेक रस्त्यांच्या कडेला वापरात नसलेली अनेक वर्षांपासून धुळखात पडलेली वाहनं लावून ठेवलेली आढळतात. या वाहनांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचं उल्हासनगर महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यामुळे वाहतूक विभाग आणि आरटीओ सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत ही वाहनं रस्त्यावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील अशा पडीक वाहनांवर 'बेवारस वाहन' असे स्टिकर्स लावले आहेत. यानंतर ही वाहनं ४८ तासात तिथून हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले असून त्यानंतरही ही वाहनं तिथे आढळून आल्यास महापालिका ही वाहनं जप्त करणार आहे.

तसेच त्यानंतरही ही वाहनं घेण्यासाठी मालक समोर न आल्यास त्यांची महापालिकेकडून थेट विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे वाहन मालकांनी पुढील ४८ तासात ही वाहनं रस्त्यावरून हटवावीत आणि ज्या वाहनांची मुदत संपली असेल त्या वाहनांची विल्हेवाट लावावी, अन्यथा महापालिका या वाहनांवर कारवाई करणार असल्याचं लेंगरेकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT