Ulhasnagar News
Ulhasnagar News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: पोलीस व्हॅनमध्ये गुंडाने केला वाढदिवस साजरा; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अजय दुधाने

उल्हासनगर - एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगर (Ulhasnagar) मधील गुंडाचा पोलिसांच्या व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ त्याच्या समर्थकांनी आपल्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या व्हॅन मध्ये असतांना देखील हा गुंड केक कापत होता मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड आहे.

हे देखील पाहा -

त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकवणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आज या गुंडाला कारागृहातून कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले होते.

यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशन झा यांने खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला.दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. दरम्यान पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा गुंड त्याचा वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो असा सवाल उपस्थित झाला आहे.आता या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT