Ulhasnagar Crime News Saam tv
मुंबई/पुणे

तलवारीचा धाक दाखवत उल्हासनगरमधील मंदिरात दरोडा; पुजाऱ्याच्या घरातूनही लुटलं लाखोंचं सोनं

या दरोड्यात पुजाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांचं सोनं आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरमधील (Ulhasnagar) स्वामी डामाराम साहिब दरबार हे मंदिराच्या आवारात असलेल्या पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पुजाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांचं सोनं आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली आहे.

श्रीराम चौकात असणाऱ्या स्वामी डामाराम साहिब दरबार मंदिराच्या आवारातच पुजारी जॅकी जग्यासी यांचं घर आहे. ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत राहतात. आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास ६ जण हातात तलवारी घेऊन त्यांच्या घरात घुसले.

पाहा व्हिडीओ -

यावेळी जॅकी जग्यासी यांची पत्नी वर्षा जग्यासी आणि त्यांच्या मुलीने दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटं आणि अन्य ठिकाणी ठेवलेलं सोनं आणि रोख रक्कम असा तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.

दरोडेखोर मराठीत बोलत होते आणि त्यांचा प्रमुख हा एक तरुण मुलगा होता, अशी माहिती वर्षा जग्यासी यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi Police) घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

श्रीराम चौकात तीन ते चार डान्सबार असून ते रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे इथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची सतत वर्दळ असते. त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. असं स्थानिक नगरसेवक धनंजय बोडारे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT