Ganesh Chaturthi 2022 : विनायक चतुर्थीला बनवा गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक !

कणकेच्या पिठापासून तयार करा उकडीचे मोदक !
Ukdiche Modak recipe
Ukdiche Modak recipe Saam Tv

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे.

गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ 'मोदक'.

Ukdiche Modak recipe
Ganesh Chaturthi 2022 : पहिल्या दिवशी बाप्पाला नारळ-बेसनाच्या मोदकाचं नैवेद्य, झटपट रेसिपी पाहाच!

गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे मग ते माव्याचे असोत किंवा उकडीचे. उकडीचे मोदक हे साधारणपणे हे तांदळापासून बनवले जातात. परंतु, आज आपण गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊया त्याची रेसिपी.

साहित्य -

सारणासाठी

ओल्या नारळाचा किस - १ कप

गूळ - १ १/४ कप

भाजलेली खसखस - १ मोठा चमचा

सुकामेवा, वेलचीपूड - आवश्यकतेनुसार

Ukdiche Modak recipe
Ganpati Special Recipe : कमीत कमी साहित्यापासून बाप्पासाठी बनवा मखाण्याचे मोदक, हेल्दी आणि टेस्टीदेखील !

पारीसाठी

गव्हाचे पीठ - १ कप

तांदूळ पिठी - १ मोठा चमचा

तूप - १ चमचा

दूध - १/२ कप

मीठ

कृती -

Ukdiche Modak recipe
Modak Recipe : उकडीचे मोदक बनवायचे आहे? कळ्या पाडताना तुटतात, या सोप्या टिप्सची मदत घ्या

१. पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करुन त्यात खोवलेला नारळ घालून चांगला परतवून घ्या. यात पाऊण कप गूळ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

Ukdiche Modak recipe
Ukdiche Modak recipe Canva

२. मध्यम आचेवर सारण एकसारखे हलवत रहा. यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स व खसखस आणि वेलची पूड घालावी. सर्व साहित्य एकसारखे मिक्स करुन घ्या. सारण अधिक कोरडे करु नका. त्यातील जास्तीचे पाणी आटल्यानंतर गॅस बंद करावा.

३. पारी बनवण्यासाठी आपण गव्हाचे पीठ व चमचाभर तांदळाची पिठी घालावी. तसेच चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करुन घ्या. वरुन १ चमचा तूप घाला, ज्यामुळे पारी खुसखुशीत होईल.

४. पारीच्या पिठात दूध (Milk) घालून चांगले मिक्स करुन घ्या व पीठ मळून घ्या. कणीक चांगले भिजल्यानंतर त्याचे गोळे बनवून घ्या. दोन्ही बाजूला पीठ लावून पुरीसारखे लाटून घ्या.

५. मोदकाच्या चाळणीला मोदक चिकटू नये म्हणून तूप लावा. तयार पारीत १ चमचा सारण भरून चिमटीत दाबून कळ्या तयार करा. कळ्या जोडल्यानंतर त्याला मोदकाचा आकार द्या व १५ मिनिटे वाफवून घ्या. ५ मिनिटांनंतर मोदक काढा.

६. तयार मोदकावर तूप घालून गरमा गरम सर्व्ह करा कणकेच्या पिठापासून उकडीचे मोदक !

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com