Ulhasnagar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO : गिऱ्हाईक बनून आला अन् मोबाईल चोरून नेला; चोरट्याचा कारनामा CCTVत कैद

उल्हासनगरातील (Ulhasnagar) एका दुकानात गिऱ्हाईक बनून आलेल्या एका भामट्याने दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

अजय दुधाने

Ulhasnagar Crime News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जन ठिकाणी संधी सापडताच चोरटे हात साप करतात. चोरटे चोरी करत असताना काही सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होतात, जे बघून अनेकांना धक्काच बसतो. अशाच काहीसा एक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगरातील (Ulhasnagar) एका दुकानात गिऱ्हाईक बनून आलेल्या एका भामट्याने दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी दुकान कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील मुख्य बाजारपेठेत लालचंद पसारी नावाचं दुकान आहे. या दुकानात सोमवारी एक भामटा खरेदीच्या निमित्तानं आला. यानंतर दुकानातील कर्मचाऱ्याला काहीतरी दाखवण्यास सांगून त्याने कर्मचाऱ्याचे कामात गुंतवलं.

कर्मचाऱ्याचं आपल्याकडे लक्ष नाही, याच संधीचा फायदा घेत या चोरट्याने दुकानातील मोबाईल घेऊन पळ काढला. हा धक्कादायक प्रकार दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरात इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली

इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. गोलमैदान परिसरातील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेतायत. गोलमैदान परिसरात कला निवास नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुदीश मायाने यांनी त्यांची दुचाकी पार्क करून ठेवली होती. मात्र रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेली. आपली ओळख पटू नये, यासाठी या चोरट्याने डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT