Eknath Shinde Governmanet Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर ठरू शकतं; कायदेतज्ञांनी मांडलं मत, पाहा VIDEO

ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उल्हास बापट आपलं मत मांडलं आहे.

Satish Daud

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाची सुनावणी झाली. जवळपास तीन तासांच्या सुनावणीदरम्यान, दोन्ही गटांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर आजची सुनावणी उद्या म्हणजे गुरूवारी होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे उद्या शिंदे (Eknath Shinde) सरकारचं काय होणार याचं भवितव्य ठरेल. दरम्यान, कोर्टातील या युक्तिवादानंतर कायदे तज्ज्ञांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उल्हास बापट आपलं मत मांडलं आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे गटाने अजूनही कोणत्याही पक्षात स्वत:ला विलीन करून घेतलेलं नाही. त्यामुळे ते अपक्ष आहे की नाही याचा निर्णय कोर्टाला घ्यावा लागणार आहे. असं उल्हास बापट म्हणाले. जर हा पक्ष बाहेर पडला आणि विलिनीकरण झालं तर शिंदे गटाचे सर्वच्या-सर्व 40 आमदार अपात्र ठरतील असंही कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

याशिवाय उल्हास बापट यांनी राज्यपालांच्या भूमिकेविषयी सुद्धा आपलं मत मांडलं आहे. उल्हास बापट म्हणाले, राज्यपालांची भूमिका काय असावी. राज्यघटनेप्रमाणे 163 कलमाअंतर्गत राज्यापालांना मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं. काही तारतम्य त्यांना दिलं आहे. पण तारतम्य कुठलं हे देखील राज्यघटनेत नमुद करण्यात आलेलं आहेत. (ShivSena Political Crisis Live)

आता सध्या जे राज्यपालांनी केलं की, मुख्यमंत्र्यांना न विचारता अधिवेशन बोलावलं. विरोधीपक्षनेते भेटायला गेल्यानंतर अधिवेशन बोलावलं. त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी घटनाबाह्य आहे. सुप्रीम कोर्टाने हे राज्यपालांना सांगायला हवं की, राज्यपालांची भूमिका नेमकी काय आहे. असं देखील कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं संपूर्ण विश्लेषण पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT