Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक? meta ai
मुंबई/पुणे

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

Sukanya Samruddhi Yojna : मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा. सुकन्या समृद्धी योजनेत पात्र मुलींची खाती उघडा. असे आवाहन आयुक्त गिरासे यांनी पुणेकरांना करण्यात आले आहे. पुणे विभागात या योजनेअंतर्गत सुमारे ८ लाख मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आले आहे.

Saam Tv

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गातील मुलींचे भविष्य हे सुरक्षित आणि सुशिक्षित होते. सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मुलींना पाठबळ मिळते. त्यामुळे समाजातील मुलींचा जन्मदरही सुधारण्यास चालना मिळते. लेक लाडकी योजना , सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या सरकारी योजनांमुळे गुंतवणुकीचे देखील अनेक पर्याय उपलब्ध होतात.

पुण्यात मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पुणेकरांना आव्हान करण्यात आले आहे. मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने (SSY) मध्ये पालकांनी आपल्या पात्र मुलींची खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आहे.

पुणे विभागात या योजनेअंतर्गत सुमारे ८ लाख मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजारापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याजदर असून, योजनेची परिपक्वता २१ वर्षांनी होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून योजनेचा अधिकाधिक प्रसार करून पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन- ८४४८३२९८४४, नितीन येवला- ८८३०७०५५४१, दिलीप सर्जेराव- ९७६६०७७९९६, केतन शित्रे, बारामती -९२७०५३२३९४, अविनाश पाखरे- ८७८८३२३२१८ यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गिरासे यांनी केले आहे. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना; मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी आयुक्त गिरासे यांचे पुणेकरांना आवाहन केले आहे.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT