ujjwal Nikam Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics News : शिंदे सरकारचं काय होणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...

ज्येष्ठ वकील तसेच कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातली सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. आता पुढील सुनावणी उद्या म्हणजेच गुरूवारी पार पडणार आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचं कोर्टात काय होणार? हे सरकार टिकणार की पडणार? अशी चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झालीये. यावर ज्येष्ठ वकील तसेच कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलं आहे. (Eknath Shinde Todays News)

'राज्यघटनेच्या संदर्भात कोणाचं कृत्य घटनाबाह्य होतं यावर आज सुप्रीम कोर्टात भाष्य अपेक्षित होतं, मात्र तसं काही घडलं नाही. बहुमत व्यक्त करणं, अंतर्गत बहुमत व्यक्त करणं अशा प्रकारचा युक्तीवाद आज सर्वोच्च न्यायालयात झाला,' अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. याशिवाय शिंदे सरकारचं काय होणार याबाबत उज्ज्वल निकम यांनी आपलं मतं मांडलं आहे. (Uddhav Thackeray Todays News)

नेमकं काय म्हणाले उज्ज्वल निकम पाहा व्हिडिओ

सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला फटकारलं

दरम्यान, आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाला फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचा अधिकार देण्याच्या मागणीवरुन सुप्रीम कोर्टाने खडसावलं आहे. शिंदे गटाकडून अपात्रतेचा मुद्दा विधानसक्षा अध्यक्षांकडे सोपवला जावा असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

यावर सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, कोर्टाने शिंदे गटाला फटकारलं सुद्धा आहे. आम्ही तुम्हाला दिलासा दिला आणि आता आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असं तुम्ही कसं सांगू शकता? अशी विचारणा कोर्टाने केली.

ज्या अध्यक्षांना बहुमताने निवडून आणलं आहे, त्यांना निर्णय घेण्यापासून रोखणं, अधिकार काढून घेणं घटनाबाह्य ठरेल. कोर्टाने त्यात ढवळाढवळ करु नये असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी केला होता.यावर सरन्यायाधीशांनी तुम्ही न्यायालयात प्रथम आल्यानंतर १० दिवसांचा वेळ दिला.

त्याचा थोडा फायदाही तुम्हाला झाला आणि आता मध्यस्थी करु नका सांगत आहात, हे कसं काय शक्य आहे? अशी विचारणा केली. एका ठराविक गटाला राज्यपालांनी बोलावलं होतं. यासंबंधी अनेक प्रश्न आहे. याशिवाय अनेक मुद्दे गैरलागू झाल्याचं आम्हाला वाटत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT