Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Udhav Thackeray: शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातातून गेले! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'म्हणाले; ज्या पद्धतीचा हलकटपणा...'

या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी हा अनपेक्षित आणि एकतर्फी निकाल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Udhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी "जेवढ्या नीच पणाने हे खेळत आहेत,"त्याचे उत्तर जनताच देईल, तसेच यापुढे आमची मशाल आणखी पेटून उठेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाले उद्धव ठाकरे..

"काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैदाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच "पक्ष कोणाच्या बरोबर आहे. कोणाच्या बरोबर आहे, हे केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर कोणीही धनाढ्य माणूस निडवून आलेले खासदार, आमदार विकत घेऊन पक्षाच सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हेदेखील मी मगे बोललेलो आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

चोर हा चोरच असतो,,,

प्रशांत भूषण यांनी दाखल केलेला न्यायालयात एक खटला सुरू केला आहे. न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्याची गरज वाटत आहे. चोराला राज्यमान्यता देणं हे भूषणावह वाटत असेल. मात्र चोर हा चोरच असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर, ज्या पद्धतीने हलकटपणा चालला आहे. त्यावरुन हे मशाल चिन्हही काढून घेतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT