Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

विश्वासदर्शक ठरावाला सामोरं का गेलो नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तर फुटीर गट उघडा पडला असता. तसाही तो उघडाच पडलाय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फुटीर गट उघडा पडलाच ना! त्याच्या आधीही उघडा पडला. आता तर रोजच उघडा पडत चालला आहे. निवडणूक आयोगाकडे जे पत्र दिलंय त्याच्यातही शिस्तभंगाची कारवाई आहे. मी पहिलंच म्हटलं होतं की, हल्ली लोकशाहीत डोकं वापरण्यापेक्षा मोजण्याकडेच जास्त उपयोग होतोय.

हे देखील पाहा -

मला सातत्याने असे भासवलं जात होते की, काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. तेच तुम्हाला पाडतील असेच सगळे म्हणायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे. मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला. अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

तुमची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी होती?

माझी मुळातच मुख्यमंत्रीपद स्वीकारायचीच तयारी नव्हती. पण त्या काळात एका जिद्दीने मी ते केले, मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो, तर एका जिद्दीने झालो. मुख्यमंत्री झालो. जिद्दीच्या बळावर अडीच वर्षांच्या काळात माझ्या परीने कारभार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

SCROLL FOR NEXT