रश्मी पुराणिक -
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांना वरती चांगलाच हल्लाबोल केला. सतत भाजप करत असणाऱ्या आरोपांवरुन आज त्यांनी सरळ त्यांना 'तुम्हाला सत्ता पाहिजेत ना, सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या; मी तुमच्यासोबत येतो असं वक्तव्यं केलं.
मी तुमच्यासोबत सत्तेसाठी येत नाही तर तुम्ही रोज याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार आमच्या कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच जर तुम्हाला तुरुंगात टाकायचं असेल तर टाका मला तुरुंगात, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.
ते पुढं भाषणात म्हणाले, मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या आहेत का मात्र तुम्ही याच शेपूट त्याला आणि त्याचं शेपूट याला जोडतं आहात एवढाच तुमचा जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात असं आव्हान देतच, मी कृष्ण नाही, मात्र तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
आम्ही केंद्राकडे अनेक गोष्टींसाठी वारंवार पाठपुरावा त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक (Karnatak) व्याप्त बेळगावचा प्रश्न आहे मात्र, केंद्र सरकार कोणाची बाजू घेत आहे ते न्यायालयातील कागदपत्र, कामकाज पाहिल्यावर कळत आहे असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.