ती मर्दाची लक्षण नाहीत, आणि हिंदुत्वाची तर नाहीच नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात !
ती मर्दाची लक्षण नाहीत, आणि हिंदुत्वाची तर नाहीच नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात ! SaamTV
मुंबई/पुणे

ती मर्दाची लक्षण नाहीत, आणि हिंदुत्वाची तर नाहीच नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात !

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सर्व राज्याच लक्ष लागून राहिलेला शिवसेनेचा दसरा मेळावा Shivsena Dasara Melava सध्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात Shanmukhananda Hall पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray भाषणाला सुरुवात करताच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप वरती हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray's criticism of BJP)

हे देखील पहा -

'ही काय लायकीची माणसं आहेत. हिंमत असेल तर अंगावर या म्हणतात. मात्र आम्ही कोणाच्या अंगावरती जात नाही आणि अंगावरती आल्यावर शिंगावर घ्यायची भाषा करणार असाल तर लक्षात ठेवा आम्ही अंगावर गेलो तर सोडत नाही. आणि स्वतःमध्ये हिंमत असेल तर समोर या ED, CBI ला पुढे करू नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्द पणाच लक्षणं नाही आणि हिंदुत्वाच Hindutva तर नाहीच नाही अशी टोकाची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर करायला हवं

हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांच्या सारखे भाजपात गेलेले लोक भाजपाचे ब्रँड त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर Brand Ambassador करायला हवेत आणि आता या लोकांवरती एक जहिरात यायला हवी "मुझे निंद की गोलिया खाकर भी निंद नही आती थी! फिर किसीने कहा तुम भाजप मे जावो अब भाजपा में जाने के बाद हमे कुंभकर्ण जैसी निंद आती है!' अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे.

तुम्ही चिरका पण माझा वाडा चिरेबंदी आहे

माझ्या भाषणानंतर अनेक जण माझं भाषण संपायची वाट बघत आहेत. कधी माझ भाषण संपतय आणि आम्ही कधी चिरपतोय? याची वाट पाहत बसले आहेत आणि या लोकांना चिरकण्याचे पैसे भेटतात अशी टीका देखील ठाकरेंनी केली आहे. आणि ठाकरे कुटुंबावर हल्ले करणार्यांना तिथल्या तिथे चेपून टाकू असा इशाराही यावेळी दिला. तसेच तुम्ही चिरका पण माझा वाडा चिरेबंदी आहे असही मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | बारामतीत पैसे वाटले, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Inspiring Story: हात गमावला, पण जिद्द नाही! मुंबईच्या अनामताने दहावीत मिळवले ९२ टक्के

Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Best Time To Eat Curd: जेवणाआधी की नंतर, दही कधी खावा?

SCROLL FOR NEXT