Shivsena Dasara Melava |"हिंदुत्व आम्ही कधीच सोडलं नाही, आणि सोडणारही नाही"

'महापालिका निवडणुकासाठी उद्धव साहेबांच्या भाषणाने नक्कीच नवी ऊर्जा मिळेल'
Shivsena Dasara Melava |"हिंदुत्व आम्ही कधीच सोडलं नाही, आणि सोडणारही नाही"
Shivsena Dasara Melava |"हिंदुत्व आम्ही कधीच सोडलं नाही, आणि सोडणारही नाही"SaamTV

मुंबई : शिवसेनेचा परंपरागत 'दसरा मेळावा' Dasara Melava मुंबईतील षण्मुखानंद (Shanmukhananda Hall) सभागृहात पार पडत आहे मुख्यमंत्री थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहचणार आहेत मात्र त्या आधीच सेनेचे नेते आपले मनोगत व्यक्त करत आहेत. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी हिंदुत्व आम्ही कधीच सोडले नाही आणि सोडणारही नाही असं वक्तव्यं केलं आहे. (We have never given up Hindutva and will never give up)

हे देखील पहा -

तसेच आज विचारांचे सोनं उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात देतील असं सांगतानाच बाळासाहेब शिवाजी पार्क वर मेळावा घ्यायचे यावेळी आम्ही आवडीने येत होतो आणि आजही येतो असं देखील ते म्हणाले.

Shivsena Dasara Melava |"हिंदुत्व आम्ही कधीच सोडलं नाही, आणि सोडणारही नाही"
रावणाला ही वाटत असेल हा माझ्या तावडीत सापडायला हवा; नीलम गोऱ्हेंचा सोमय्यांवरती घणाघात !

सेनेचा आजचा मेळावा हा येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणूकांसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे आज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असतानाच सेनेचे अन्य नेते देखील आपली मतं व्यक्त करतं आहेत. अशातच 'महापालिका निवडणुकांसाठीउद्धव साहेबांच्या भाषणाने नक्कीच नवी ऊर्जा मिळेल' असं वक्तव्यं देखील चंद्रकांत खैरेंनी केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com