Uddhav Thackeray Kalyan Visit Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Lok Sabha Seat: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा

Uddhav Thackeray Kalyan Visit: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सूरु केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Uddhav Thackeray Kalyan Visit:

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सूरु केली आहे. यासाठी १३ जानेवारी राेजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात येणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत येणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले हाेते.   (Latest Marathi News)

या बैठकी दरम्यान संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हा प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पाटील, माजी महापौर रमेश जाधव, धनंजय बोडारे आणि चंद्रकांत बोडारे उपस्थित होते.

यातच शिवसेना शिंदे गटावर टीका करत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी म्हणाले, ज्यांना पाळलं पोसलं. पाणी पाजलं. अन्न दिले, सर्व दिले, ते पाठीत खंजीर खुपसून गेले. इतकेच नाही तर या माणसाने संघटनेवर घाला घातला. ही ज्वाला तुमच्या हृदयात पेटली आहे. येत्या १३ जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत साळवी यांनी हे विधान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT