uddhav thackeray raj thackeray saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत करणार चर्चा? संदीप देशपांडे म्हणाले...

Maharashtra Political News: उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत करणार चर्चा? संदीप देशपांडे म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

>> गिरीश कांबळे

Balasaheb Thackeray Memorial News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरुवातीचे भाषणं संग्रहित केली होती. ही भाषणं राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात, त्यासंदर्भात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

'२०१४, २०१७ मध्ये राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना फोन केले होते'

याबद्दल बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत की, अनेक लोकांनी मला असं सांगितलं आहे की, ते (उद्धव ठाकरे) असं म्हणाले आहेत की, माझी फोन करायची इच्छा आहे. पण ते फोन उचलणार का याची गॅरंटी हवी, तरच फोन करणार. हा विचित्र पण झाला. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''एका भावाने दुसऱ्या भावाला फोन करताना कसली गॅरंटी मागत आहेत.'' देशपांडे म्हणाले, ''२०१४, २०१७ मध्ये राज ठाकरे यांनी स्वतः त्यांना फोन केले होते. युती संदर्भात हे फोन करण्यात आले होते. मात्र त्यांनी फोन उचलले नाही. त्यामुळे मला असं वाटत ही अडचण कोणाची होते, जो लोकांचे फोन उचलत नाही.''

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. अत्याधुनिक अशा डिजिटल भिंती, लेझर शो, दृक श्राव्य माध्यम, व्हर्च्युअल रियालिटी आदी तंत्रज्ञानाचा वापर करून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची माहिती दृक, श्राव्य रुपात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणे, फोटो, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील लेख आदी गोष्टी उद्धव ठाकरे गोळा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT