Ekanath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena Clash Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार? ठाकरेंनी आखला मोठा प्लॅन, शिंदे गटही सतर्क!

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे.

Satish Daud

Ekanath Shinde vs Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत एक मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाच्या वतीने या ‘कॅव्हेट’द्वारे करण्यात केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह अन्य आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारपासून पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी त्याविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. यामुळेच शिंदे गटातर्फे शनिवारी रात्रीच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली, तर त्यावर आमची बाजू ऐकून न घेता सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी करू नये, असे यात म्हटले आहे.

"...तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार"

दरम्यान, निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसह निकाल जर ठाकरे गटाच्या बाजूने लागला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी वेळेमध्ये गंभीर चूक केलेली आहे, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Navi Mumbai : नवी मुंबईत सशस्त्र दरोडा! व्हॅनमधून २० कोटींचं सोनं लुटलं; परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान

WhatsApp Update : व्हॉट्सॲपचा भन्नाट फीचर! परदेशातही मिळणार इंटरनेट, नंबर बदलण्याची गरजच नाही

SCROLL FOR NEXT