Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने येणार? दिल्लीतून आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर

Rahul Narvekar In Action Mode: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने येणार? दिल्लीतून आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर

Satish Kengar

Uddhav Thackeray vs Eknath Shinde:

आमदार अपात्रतेचा मुद्दा गरम असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी थेट दिल्ली गाठली. सुप्रीम कोर्टानं झापल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीत जाऊन कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. सुनावणीसाठी आता पहिल्यांदाच पक्के वैरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे आता नार्वेकर हे दिल्लीतून आल्यानंतर चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचाली वाढल्या असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासह इतर कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाला उद्याच नोटीस बजावण्यात येणार असून येत्या 25 सप्टेंबरला नार्वेकरांसमोर सुनावणी होणार आहेत. विशेष म्हणजे या सुनावणीत पहिल्यांदाच पक्के वैरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे समोरासमोर उभे ठाकणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

ठाकरे आणि शिंदे यांना देखील उद्याच नोटीस बजावण्यात येत असल्यानं सगळ्यांच्या नजरा या सुनावणीकडे लागल्यात. तर याबाबत दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहितीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलीये.

राहुल नार्वेकर म्हणाले, “काही भेटीगाठी कायदेतज्ज्ञांबरोबर होत्या. एकूण अपात्रतेबाबतचा हा कायदा बदलत जाणारा आहे. त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्याबाबत आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणं आवश्यक आहे? या संदर्भातील अनेक विषयांवर माझी अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली.”

''गरज पडली तर पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावण्यात येईल.'' असं म्हणत राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावण्याबाबत सूचक वक्तव्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT