Kalyan Dombivli Mayor election : कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवेकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंची युती झाली होती. महायुतीच्या विरोधात ठाकरेंनी जोरदार लढा दिला, पण त्यांना हवं तेवढं यश मिळाले नाही. आता निवडणुकीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरेसेनेत नाराजी आहे. मनसेच्या ५ उमेदवारांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे आता ठाकरे बंधूंमध्ये नाराजी झाली आहे. (Sanjay Raut statement on MNS)
कल्याण डोंबिवलीमध्ये राजू पाटील यांनी मनसेचा गट स्थापन केला. त्या गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. सत्तास्थापनेसाठी मनसेकडून शिंदेंना पाठिंबा दिला. मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनीही आपली नाराजी बोलून दाखवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत थोड्याच वेळात राज ठाकरेंची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर चर्चा होणार आहे.
मनसेचा शिंदेंना पाठिंबा, ठाकरेसेना संतापली
मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. दोघे भाऊ एकत्र आल्याने मराठी माणसाने आनंद व्यक्त केला. अशा परिस्थितीत असा निर्णय घेतला जात असेल तर पक्ष सोडा ज्या लोकांकडे मते मागितली. जी लोक तुमच्यासाठी फिरले, जय जयकार केला. झेंडे हाती घेतले. त्यांचा तरी विचार करायला पाहिजे होता, असा संताप ठाकरे गटाचे सचिन बासरे यांनी व्यक्त केला. आमचे चार बंडखोर आमच्यासोबत येतील. सात नगरसेवक सुरक्षित स्थळी, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, असेही ते म्हणाले.
महायुतीचे अखेर ठरले
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झालेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे. तीन ही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे, त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.