Uddhav Thackeray News SAAM TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : सूरत-गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं नेमकं कारण

Uddhav Thackeray On Shivsena Dispute : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये झालेला बंड आणि शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.

Nandkumar Joshi

Uddhav Thackeray On Shivsena Dispute : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये झालेला बंड आणि शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. सूरत-गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना का थांबवलं नाही, याचं थेट कारण उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केलेल्या भाषणात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंड आणि शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत थेट भाष्य केले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'लोक येतात-जातात. मला अनेकदा विचारलं जातं की, तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही थांबवलं का नाही? पण त्यांना कशाला थांबवू, असं मी सांगितलं.'

ही सगळी माणसं विकली गेलेली आहेत. त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढू. दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचे आहे त्यांनी थांबावे. नाही तर गेट आऊट. मी त्यांना कशाला थांबवू. मला विकाऊ माणसे नकोत. ते शिवसैनिक होण्याच्या लायकीचे नाहीत. कुणी सांगेल तशीच भूमिका घ्यायची, इतका लाचार मी कधीच झालो नाही आणि होणारही नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

एकनाथ शिंदेंना टोला

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी घेतलेल्या सभेचा त्यांनी दाखला दिला. आता तिकडे बसणाऱ्यांनी तेव्हा त्या सभेत एक नाटक केलं होतं. तेव्हा भाजप-शिवसेना युतीचं (BJP-Shivsena) सरकार होतं. त्या सभेत याच माणसानं नाटक केलं होतं.

भाजपकडून शिवसैनिकांवर अन्याय होत आहे आणि हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, म्हणून डोळे मिटून तिकडे जातो असं काही असलं तर मला माहीत नाही, असा उपरोधिक टोला उद्धव यांनी लगावला.

भाजपसोबत आम्ही होतो, तेव्हा भाजप अन्याय करत होता, आता आम्ही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आहोत, तर ते अन्याय करतात. यांना नक्की काय हवं आहे हेच कळत नाही. जायचंच होतं तर मोकळं रान होतं ना? मी कधी काही विचारलं होतं का, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

SCROLL FOR NEXT