Uddhav Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray News : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान नाही का, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई महापालिका जिंकणार असल्याचा विश्वास ठाकरेंकडून व्यक्त

फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांवर ठाकरेंची टीका

संजय गडदे, साम टीव्ही

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र, कार्यकर्त्यांकडून विरोध झाल्याने चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान नाही का, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना भवनातील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

मी ज्येष्ठ हा शब्द वापरत नाही. कारण शिवसेना आणि शिवसैनिक कधीही म्हातारा होत नाही. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माणूस वयाने थकतो, पण तो जेव्हा मनाने थकतो तेव्हा तू लुप्त होतो. तुमच्याकडे मला नाही वाटत की, तुमची मन थकली आहेत. सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना पाहून मला आज लहान झाल्यासारखं वाटलं. मी यांच्यापेक्षा लहानच आहे. हे एखाद्या सुरक्षा कवचासारखे शिवसेनाप्रमुखांसोबत असायचे.

तुम्ही तेव्हा शिवसेनाप्रमुखांसोबत होतात म्हणून कुटुंबीय निर्धास्त असायचं. कोणाची हिंमत होत नव्हती. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिंमत नव्हती.तुम्ही वयाने आज सर्व कदाचित किंचितशी वाकले असतील. वेडात मराठे वीर दौडले सात तुम्हाला आठवत असेल, तर जनता पक्षाचा जो काळ होता. मुरारजी देसाईचे नरराक्षक होते, त्यांची सभा शिवाजी पार्कमध्ये झाली.

शिवसेना भवनचे बांधकाम तेव्हा पूर्ण झाले नव्हते. तेव्हा प्रचंड समुदाय शिवसेना भवनासमोर जमला आणि दगडफेक झाली. तेव्हा जे काही मराठी शिवसैनिक तिथे होते, त्यांनी त्यांचा डाव उधळून लावला. तेव्हा सगळ्यांना कळलं की, शिवसैनिकांची टक्कर देणं म्हणजे हमसे जो टकरायेगा व मिट्टी मे मिल जायेगा. आजचा काळ हा विचित्र आहे. हिंदुत्व या एका शब्दासाठी आपण मागचे 25 वर्ष त्यांचे चोचले ऐकले. त्यांना खांद्यावर बसवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं. ते आता खांद्यावर बसून लाथा मारत आहेत.

मराठ्यांच्या घोड्याच्या टापांनी दिल्ली थरथरायची. दिल्लीचे हे तक्त राखी तो खरा मराठा आणि मराठी. आत्ताचे दिल्लीचे बूट चाटत आहेत हे भगव्याच्या अवलादीचे नाहीत. मी सुद्धा कधीतरी काही आमंत्रण आलं तर दिल्लीला जातो. खासदारांना भेटायला किंवा काही कार्यक्रम असेल तर. पण आता जे हुजरेगिरी करायला दिल्लीत जातात.उठसूट कोणालाही पक्षात घेत आहेत. बाबू शेठ हे शिवसैनिक मुस्लिम आहेत. असे अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधूनही संघाबाहेर; कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?

SCROLL FOR NEXT