उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यातून भाजपवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांची भाजप, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
भाजपला अमिबा म्हणत ठाकरेंची टीका
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर तुफान टीका केली. एकीकडे पाऊस सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजप आणि महायुती सरकारवर बरसले. 'भाजप आता अमिबा झाला आहे. जिथं घुसतो तिथं उध्वस्त करतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
तीन वर्ष मणिपूर जळत आहे. काल परवा नरेंद्र मोदी मणिपुरात गेले. तेथील महिलांच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. तिकडे मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार. एवढं करून मोदी गेले. मोदी तिकडे जाऊन तोडगा काढतील. त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांचं सात्वंन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण समोर आलं.
हसायचं की रडायचं? त्यांना मणिपुरात जाऊन मणी दिसला. मात्र, त्यांच्या डोळ्यातील पाणी दिसलं नाही. त्यामुळे मराठी सक्तीची पाहिजे. तेथील जनता आक्रोश करत आहे. रडत आहे. यांची वृत्ती पाहून वाटतं की, भाजप आता अमिबा झाला आहे. एकपेशी जीव. हा अमिबा कसाही वेडा वाकडा पसरतो. शरीरात गेलं पोट बिघडतं. तसं समाजात गेल्यावर शांती बिघडते. त्यामुळे अमिबा म्हणत आहे.
मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहात. एका वृत्त संस्थेने सर्व्हे केला. भारतातील सर्वात प्रसिद्ध मुख्यमंत्री कोण? दोन-तीन महिन्याचा सर्व्हे आहे. आपल्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये यायचा. ते माझं महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं.
एका सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. तीनवर चंद्रबाबू नायडू, चौथ्यावर नितीन कुमार, पाचव्यावर तामिळनाडूचे स्टॅलिन, नंतर पिनाराई विजयन, रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंत विश्वकर्मा. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर फडणवीस आहेत. नशीब दहावे आहेत. नाही तर आडनावासाखं विसावे आले असते. येणार कसे? सगळी बजबजपुरी झाली आहे.
अधिकारी पकडले जात आहेत. पण मंत्री पकडले जात नाहीत. आई-पत्नीच्या नावावर डान्सबार काढले जात आहेत. पण फडणवीस समज देऊन सोडून देत आहेत. मला आरएसएसला प्रश्न विचारायचा आहे. निवडणुका येत आहेत. जनता निवडणुकीची वाट पाहत आहेत. जरा पाऊस झाल्यावर रस्ता तुंबतो. मेट्रो स्टेशन तुंबत आहे. मोनो रेल लटकत आहे. मात्र, भाजप महापौरासाठी दिल्लीत जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.