Shiv Sena UBT Saam Tv News
मुंबई/पुणे

BMC Election : महापालिकेआधी ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी, एकाचवेळी ४०० जणांनी घेतली मशाल

Shiv Sena UBT : मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकाचवेळी ४०० हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. भांडुपमध्ये ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Namdeo Kumbhar

400 workers join Shiv Sena before BMC elections : राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. मुंबईसह पुणे अन् राज्यातील २९ महापालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी लागलीय. होय, आऊटगोईंगमुळे शिवसेना खिळखिळी झाली होती. पण सोमवारी शिवसेनेत एकाचवेळी ४०० जणांनी प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेसाठी प्रचार अन् उमेदवाराच्या मुलाखती सुरू असताना ४०० जणांनी शिवसेनेची मशाल घेतली. त्यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद वाढली आहे. (Shiv Sena (UBT) Revives in Mumbai as 400 Workers Enter Party Before Civic Poll Battle)

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलेय. मुंबई कोकणापासून संभाजीनगर ते नागपूर अन् उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यामुळे ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली असेच म्हणत होते. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं इनकमिंग सुरू झाले आहे. भांडुपमधील ४०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी एकाचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटवली. भाजप, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकाचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडत असताना दुसरीकडे मात्र भांडुपमध्ये ४००हून अधिक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या इनकमिंगमुळे ठाकरेंची शिवसेनेची ताकद वाढली आहे. भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११५ मधील शिंदे गटातील माजी नगरसेवकाला टक्कर देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला आहे. आमदार सुनील राऊत आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झालाय. भांडुपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

SCROLL FOR NEXT