Manisha Kayande News Saam tv
मुंबई/पुणे

Manisha Kayande News: मोठी बातमी! ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई; थेट पक्षाच्या प्रवक्तेपदावरून केली हकालपट्टी

Manisha Kayande News: ठाकरे गटाने मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे

Vishal Gangurde

निवृत्ती बाबर

Manisha Kayande News: आज दिवसभरापासून ठाकरे गटाच्या विधान परिषद सदस्या मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. अशातच ठाकरे गटाने मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाकडून उद्या १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनासाठी जय्यत सुरू आहे. पक्षातील बड्या नेत्यांकडे या कार्यक्रमाची जबाबदारी आहे. अनेक नेते या कार्यक्रमाच्या तयारीसाठी व्यग्र आहे. या दिनाच्या आधीच मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कायंदे याच्या शिंदे गट प्रवेशाच्या चर्चांवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, कायंदे यांच्याकडून या चर्चांवर एकही प्रतिक्रिया आलेली नाही. या मात्र, या चर्चांवर शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वागताच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मनिषा कायदे या शिंदे गटात जाण्यापूर्वीच ठाकरे गटाने मोठी कारवाई केल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाने परिपत्रक काढून कायंदे यांच्यावर कारवाई केली आहे. ठाकरे गटाच्या कारवाईवर कायंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.

ठाकरे गटाच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, 'प्रा. मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे'.

कोण आहेत मनिषा कायंदे?

प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. मनिषा कायंदे यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे. 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. कायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत.

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. त्यांनी तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. 1997 मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला.

२०१२ साली शिवसेनेत प्रवेश

2009 मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 2012 मध्ये कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. 18 जुलै 2018 ला विधानपरिषद सदस्यपद मिळालं. शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. मात्र, त्यांची आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT