Uddhav Thackeray-Raju Shetti  Saam TV
मुंबई/पुणे

Kolhapur Politics News : उद्धव ठाकरे-राजू शेट्टी यांची मुंबईत भेट, कोल्हापूरच्या राजकारणाला धार चढली

Uddhav Thackeray-Raju Shetti : खासदार असताना राजू शेट्टी यांनी शिवसैनिकांना कोणतीही मदत केलेली नाही, असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजीत माजगांवकर

Kolhapur News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरु झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

राजू शेट्टी यांना सोबत घेऊन हातकणंगलेतून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, यावर या बैठकीत चर्चा होऊ झाल्याचा अंदाज आहे. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. (Political News)

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंची बातमी वाऱ्याच्या वेगाने कोल्हापुरात पोहोचली आणि स्थानिक राजकारण पेटलं. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट सुरु असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निष्ठावंतांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

कोल्हापूरचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी माध्यमांसमोर येत उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या भेटीबाबत संताप व्यक्त केली. राजू शेट्टी हे बेभरवशाचे आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राजू शेट्टी यांना शिवसेनेतून हातकणंगले मतदारसंघासाठी उमेदवारी देऊ नका, असं मुरलीधर जाधव यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१४ साली राजू शेट्टी यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. राजू शेट्टींना कधीही जवळ करु नका. माझा विचार नाही केली तरी चालेल, पण निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्या. पक्ष फुटल तरी आम्ही तुमच्यासोबत राहिलो, अशी मागणी मुरलीधर जाधव यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

खासदार असताना राजू शेट्टी यांनी शिवसैनिकांना कोणतीही मदत केलेली नाही, असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसोबच्या भेटीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलं की, आगामी निवडणुकीच्या जागापाटपासंदर्भात आमची काहीही चर्चा झाली नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत.

ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा आम्ही आमच्या भूमिकेसोबत जाऊ. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. त्यासाठी पाठिंबा मिळावा यासाठी ठाकरेंची भेट घेतली. महाविकास आघाडीसोबत माझं काही देणं घेणं नाही. मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT