Uddhav Thackeray Press Conference SAAM TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : देशात हुकूमशाही सुरू झाल्याचं PM मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषित करावं: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

Uddhav Thackeray On Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. देशात आता हुकूमशाही सुरू झालीय, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषित करावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  (Breaking Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज, शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिला. हा निर्णय आल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग, भाजप, एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हा अन्याय आहे. देशात हुकूमशाही सुरू झाली आहे, हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषित केलं तर चांगलं होईल. लोकशाही तर आता देशात राहिलेली नाही. ज्या पद्धतीने हा निर्णय दिला आहे, ते बघता आम्ही निवडणूक आयोगाकडे लाखोंच्या संख्येने कागदपत्रे, पुरावे दिले होते, पण तरीही फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या जोरावर पक्षाचे नाव आणि चिन्ह कुणाला द्यायचे हे निश्चित केले. हा अन्याय आहे.

पक्ष आणि राज्यातील जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी वारंवार आव्हान देत आलो आहे की हिंमत असेल तर मैदानात या, निवडणूक घ्या. निवडणुका घेण्याची हिंमत यांच्यात नाहीच. आता कदाचित येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत ते निवडणुकांच्या तारखाही घोषित करतील, अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT