uddhav thackeray news
uddhav thackeray news  saam tv
मुंबई/पुणे

Shivsena Vs Shinde Group : शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र; उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

Shivsena Vs Shinde Group News : मुंबई - शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील धुसफूस आता चांगलीच वाढू लागली आहे. खरी शिवसेना कुणाची यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष राज्यात सुरु झाला आहे. या संघर्षाची प्रचिती काल प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरून अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिवसैनिकांचं शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेटीनंतर शिवसैनिकांचं कौतुक केलं आहे.

शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी शिवसैनिकांना काही तासांनी सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचं कौतुक केलं. या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटो काढले. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः जमिनीवर बसत या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला जागा दिली.

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी महेश सावंत यांनी प्रभादेवीमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य केलं. 'दीड ते दोन महिने आम्ही उत्सवात असतो. आमच्या अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ. ३९५ हे कलम लावायची गरज नव्हती. २ महिन्यांपासून आम्ही पोलिसांना सांगत आहे. त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. त्यात एक पोलीस जखमी झाला, असा दावा महेश सावंत यांनी केला. 'आमची ताकद, आम्हाला दाखवावी लागली. आम्ही निष्ठावंत आहोत. उद्धव ठाकरे साहेब म्हणाले, संयम पाळा. ते दोन महिने आम्हाला डीवचत होते. त्यामुळे संयमाचा बांध कधीतरी तुटतो'.

कोण आहेत महेश सावंत?

या सगळ्या राड्यात उद्धव ठाकरे गटातील महेश सावंत यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. आमदार समाधान (सदा) सरवणकर यांना चॅलेंज देणारे महेश सावंत कोण आहेत असा प्रश्न पडतो. तर, समाधान सरवणकर यांच्या विरोधात २०१७ मध्ये महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार यांचा विजय झाला मात्र, समाधान सरवणकर यांची निवडणुकीत चांगलीच दमछाक महेश सावंत यांनी केली होती. ही निवडणुक झाल्यावर महेश सावंत पुन्हा शिवसेनेत आले. राज्यात बंडखोरीनंतर आता सदा सरवणकर हे शिंदे गटात गेले. मात्र, महेश सावंत हे शिवसेनेतच राहिले. त्यामुळे आजच्या राड्याच्या निमित्ताने महेश सावंत आणि सदा सरवणकर पुन्हा आमने सामने आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

Suresh Raina: सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तींचे अपघातात निधन

Today's Marathi News Live : कराडमध्ये केमिकल गॅसच्या टँकरला गळती

SCROLL FOR NEXT