Uddhav Thackeray meet Ajit Pawar
Uddhav Thackeray meet Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray meet Ajit Pawar : अजित पवारांचं कौतुक अन् शिंदे-फडणवीसांवर निशाणा, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

प्रविण वाकचौरे

Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी आज राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे आणि दोन्ही सभागृहातील शिवसेनेचे काही नेतेही अजित पवार यांच्या कार्यालयात त्यांच्या भेटीला गेले आहेत.

या भेटीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, राज्यासाठी चांगलं काम करावं असं मी त्यांना म्हटलं आहे. कारण सध्या सत्तेची साठमारी चालली आहे. त्यामध्ये राज्याचे प्रश्न मागे पडत आहे.

आता राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी पाऊस नव्हता म्हणून हवालदिल होता. आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढू शकतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असं अजित पवारांना सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

अजित पवारांसोबत मी अडीच वर्ष काम केलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. इतरांची जरी सत्तेसाठी धावपळ चालू असली तरी त्यांच्याकडून राज्यातील जनतेला वेळेवर मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा त्यांच्याकडे आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (Latest marathi News)

किळसवाणे व्हिडीओ बघत नाही

किरीस सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मी असे किळसवाणे व्हिडीओ बघत नाही. मात्र राज्यातील जनतेने आणि माता-भगिनींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं त्यांच्या भावनांची कदर सरकारने केली पाहिजे. (Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon in Kerala : आनंदाची बातमी! येत्या ४८ तासांत मान्सून केरळात धडकणार; या भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Horoscope Today : या राशींच्या लोकांना आज मिळणार मोठं यश, तुमची रास?

Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांची सकारात्मकता वाढेल; यश पदरात पडेल

Advocate Black Coat: काळा कोट नको! कोटच्या विरोधात वकील पोहोचले थेट सर्वोच्च न्यायालयात

60 KM मायलेज, किंमत 80000 हजारांपेक्षा कमी; जबरदस्त Honda ची न्यू जनरेशन बाईक Livo

SCROLL FOR NEXT