Eknath shinde and uddhav thackeray
Eknath shinde and uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

उद्या स्वत:ला मोदी समजतील व पंतप्रधानपदावर दावा करतील; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीची राज्यात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे.

प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील व पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपवाल्यांनो सावधान, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली. या मुद्द्यावर प्रश्न विचारला यावर उत्तर देताना, उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक आहेत. आणि आता हे हा मुद्दा उपस्थित करत आहेत.

गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT