बंडखोरांनी आपल्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माध्यमांना मुलाखत दिली आहे.
uddhav thackeray interview with sanjay raut
uddhav thackeray interview with sanjay rautSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बंडानंतर पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

बंडखोर आमदारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावी. बंडखोर आमदारांनी आपल्या भाषणात आपल्या आई-वडिलांचे नाव घेऊन निवडणूक (Election) लढवावी. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान बंडखोर आमदारांना उद्वव ठाकरे यांनी दिले आहे.

uddhav thackeray interview with sanjay raut
शिवसेनेत एवढी मोठी फूट का पडली? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

दरम्यान, शिवसेनेत (ShivSena) मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बंडखोर आमदारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

शिवसेनेत एवढी मोठी फूट का पडली?

शिवसेनेत याअगोदरही फूट पडली होती. छगन भुजबळ, नारायण राणे हेही शिवसेनतून बाहेर पडले होते. पण शिवसेनेत त्यावेळी एवढी मोठी फूट पडली नव्हती. या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शिवसेनेत मी ज्यांना अधिकार दिले होते, त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत.

uddhav thackeray interview with sanjay raut
...तेव्हा पासून सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या; शिंदे गटावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

...तेव्हा पासून सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या

माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असे काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com